📢 नागरिकांना आवाहन – आगामी ग्रामसभेस उपस्थित राहून आपले सूचना / अभिप्राय नोंदवावेत. 📢 पाणीपुरवठा दुरुस्तीच्या कामामुळे दिनांक १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. 📢 ग्रामपंचायतीच्या कराची थकबाकी ३० सप्टेंबर पर्यंत भरणा करावा, अन्यथा दंड आकारला जाईल. 📢 ग्रामपंचायत रसलपूर येथे दिनांक २० सप्टेंबर रोजी स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात येत आहे. सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवावा.

गावाविषयी माहिती

प्रभू श्री रामचंद्रांच्या पावन स्पर्शाने पावन झालेले दारणासांगवी  हे गाव महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात दक्षिणोत्तर दीड कोस वाहणाऱ्या पवित्र गोदावरी माता नदीच्या काठी वसलेले टुमदार असे एक छोटेसे प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे १७६५  आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २, अंगणवाडी केंद्रे २ व व्यायामशाळा १, अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच सर्व देवी देवतांचे मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी  अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून कोबी, फुलकोबी, ऊस, सोयाबीन, कांदा, शिमला मिर्ची व मका ही प्रमुख पिके घेतली जातात.  या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. नाशिक जिल्यात भाजीपाला उत्पन्न मध्ये दारणासांगवी  गावाचा मोठा वाटा आहे.

दारणासांगवी  ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थींना घरकुल लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दारणासांगवी गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF) दर्जा मिळवला आहे. जल जीवन मिशन व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

दारणासांगवी  गाव आज निफाड तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

भौगोलिक स्थान

दारणासांगवी  हे गाव निफाड तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे  कि.मी. अंतरावर व नाशिक शहरापासून २२  किमी अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण क्षेत्रफळ ५०४.४४ चौ.कि.मी. असून ग्रामपंचायतीमध्ये ३ वार्ड आहेत. एकूण २७१ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या १७६५ आहे. त्यामध्ये ९३०पुरुष३५महिला यांचा समावेश होतो.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे. गावालगत गोदावरी व दारणानदीचा संगम आहे आहे ज्यामुळे पिकांना पाणीपुरवठा होतो. येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे. उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३८° से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात ° से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.

दारणासांगवी  गाव कोबी, फुलकोबी व भाजीपाला उत्पादनासाठी संपूर्ण नाशिक जिल्यात प्रसिद्ध आहे.

Creative Graphic Designs

लोकजीवन

दारानासांगवी  गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून कोबी, फुलकोबी, ऊस, कांदा, मका व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व लघुउद्योग यामध्येही कार्यरत आहेत.

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

दारणासांगवी  गावाच्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

लोकसंख्या

पुरुष

स्त्रिया

सन २०११ नुसार

एकूण

संस्कृती व परंपरा

दारणासांगवी  गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व अखंड हरीनाम साप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

यामुळे दारणासांगवी  गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

प्रेक्षणीय स्थळे

  • ग्रामदैवताचे मंदिर – संगमेश्वर महादेव मंदिर  हे गावातील प्रमुख देवतेचे मंदिर आहे हे गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षीमहाशिवरात्रीला  यात्रा, धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

 

  • हनुमान मंदिर – गावाच्या मध्यवर्ती भागात असलेले हे मंदिर उत्सव व सणासुदीला ग्रामस्थांच्या भेटीगाठींचे केंद्र असते.

 

  • दत्त मंदिर :- गावाच्या सुरवातीलाच भव्य असे दत्त मंदिर आहे यात श्री दत्त महाराज,श्री.महादेव व श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे येथे दर वर्षी दत्त जयति सप्ताह साजरा केला जातो.

 

  • गोदावरी व दारणानदी संगम  – दक्षिणोत्तर दीड कोस वाहणाऱ्या गोदावरी नदीमुळे व दारानानदी  यांच्या संगमामुळे जलसंधारणाची चांगली सोय होते यामुळे शेती, मासेमारी, पर्यटन विकास यामुळे परिसरात नैसर्गिक सौंदर्य खुलून दिसते.

 

  • रोकडोबा मंदिर  – दारणासांगवी  गावामध्ये रोकडोबा पुरातन मंदिर आहे. हे मंदिर संपूर्ण दगडात बांधले असून ग्रामस्थांचे श्रद्धा स्थान आहे.

 

  • खरबुजा माता मंदिर :- येथे उंच डोंगरावर खरबूज मातेचे मंदिर आहे येथे दर वार्षी नवरात्रात यात्रा केला जातो.

 

  • स्मशान भूमी – दारणासांगवी दारणागोदावरी च्या संगावर असलेली  गावातील स्मशान भूमी हे पंचक्रोशीतील प्रमुख आकर्षण आहे. येथील निसर्गरम्य वातावरणामुळे या वैकुंठधाम परिसरास अनोखे आकर्षण आहे.

जवळची गावे

दारणासांगवी हे  गाव गोदावरी-दारणा नदीच्या संगम किनारी वसलेले असून निफाड-नाशिक व सिन्नर अशा तीन तालुक्यांच्या सीमेवर वसलेले आहे त्याकारणाने दारणासांगवी गावाला लागत सिन्नर तालुक्यातील जोगल टेंभी नाशिक तालुक्यातील हिंगणवेढा व निफाड तालुक्यातील शिंपी टाकळी,लालपाडी, व-हेदाराना,चितेगाव व चांदोरी हि  आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे दारणासांगवी  गावाशी सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.

चाटोरी, नागापूर, वर्हेदारणा, शिंपीटाकळी , लालपाडी ही दारणासांगवी  आसपासची प्रमुख गावे आहेत.

गटविकास अधिकारी

गटविकास अधिकारी 

ग्रामपंचायत प्रशासन

सौ. सुवर्णा सुनील फड

सरपंच

(+91 ) 955527 48152

सौ.सुनिता दशरथ आढाव

उपसरपंच

(+91 ) 98508 47243

श्री. भाऊसाहेब शिवाजी गोहाड 

सदस्य

(+91 ) 99221 73248

श्री. सचिन बाळासाहेब यादव

सदस्य

(+91 ) 78208 13505

सौ. सोनल सुनील साळवे  

सदस्य

(+91 ) 98502 53683

सौ. रंजना आनंदा काकड

सदस्य

(+91 ) 90110 18481

सौ. कुसुम आनंदा बेंडकुळे

सदस्य

(+91 ) 88882 11626

श्री. चिंतामण महादू शेलार

सदस्य

(+91 ) 95296 61673

श्री. कांतीलाल सुदाम बोडके

सदस्य

(+91 ) 75880 36023

समन्वय कर्मचारी

अ.नं. नाव विभाग पद संपर्क क्रमांक
1. श्री. खुशाल भाऊसाहेब पाटील ग्रामपंचायत अधिकारी (+91) 97633 77805
2. श्रीमती. पूर्वा राठोड ग्राम महसूल अधिकारी (+91) 99702 40912
3. श्री. गोरक्षनाथ पुंजाजी काकड पोलीस पाटील (+91) 72180 09593
4. श्री. सुरेश प्रकाश गांगोडे सहाय्यक कृषी अधिकारी (+91) 98813 15433
5. श्री. शिवाजी हरी बोडके कोतवाल (+91) 90756 08171
6. सौ. सुवर्णा सुनील तोडकर ग्रामपंचायत कर्मचारी (+91) 97642 45905
7. श्री. विशाल चंद्रभान बोराडे ग्रामपंचायत कर्मचारी (+91) 72183 91420

ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांचेकडे मिळणारे दाखले

जन्म नोंद दाखला

मृत्यु नोंद दाखला

विवाह नोंदणी दाखला

दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला

ग्रामपंचायत थकबाकी नसल्याचा दाखला

निराधार असल्याचा दाखला

नमुना ८ चा उतारा

शिक्षण विभाग

अंगणवाडी विभाग

विद्यार्थी संख्या

अंगणवाडी नाव मुले मुली एकूण
अंगणवाडी ४९ 42 51 93
अंगणवाडी ३०२ 30 27 57
एकूण 72 78 150

अंगणवाडी सेविका माहिती

नाव पद नाम मोबाईल क्रमांक
श्रीमती. नंदा निवृत्ती बर्वे अंगणवाडी सेविका (+91) 93702 25354
सौ. इंदुबाई शिवाजी बोराडे अंगणवाडी सेविका (+91) 95275 90150
श्रीमती. मनीषा लक्ष्मण काकड अंगणवाडी मदतनीस (+91) 97674 53166
सौ. सुनिता अशोक काकड अंगणवाडी मदतनीस (+91) 95619 99610

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दारणासांगवी

विद्यार्थी संख्या

इयत्ता मुले मुली एकूण
पहिली 05 05 10
दुसरी 05 01 06
तिसरी 01 04 05
चौथी 04 06 10
पाचवी 09 07 16
सहावी 06 07 13
सातवी 09 09 18
एकूण 39 39 78

शिक्षक माहिती

नाव मोबाईल क्रमांक
श्री. मोरे दीपक पोपट (+91) 94235 55163
श्री. भागवत फकीरा गायकवाड (+91) 86053 51588
श्रीमती. मनीषा शिवाजी गांगुर्डे (+91) 94056 46091

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानमळा

विद्यार्थी संख्या

इयत्ता मुले मुली एकूण
पहिली 06 01 07
दुसरी 06 04 10
तिसरी 06 06 12
चौथी 04 05 09
एकूण 22 16 38

शिक्षक माहिती

नाव मोबाईल क्रमांक
श्रीमती. संतोषी दिगंबर नांदुरकर (+91) 94237 01890
श्रीमती. आशा रामनाथ उगले (+91) 96579 77060

आरोग्य विभाग

अ.नं. नाव आरोग्य विभाग पद संपर्क क्रमांक
1. डॉ. सुजित कोशिरे तालुका वैद्यकीय अधिकारी (+91) 94227 57565
2. पी.एच.सी. वैद्यकीय अधिकारी
3. डॉ. ऐंजल चव्हाण उपकेंद्र वैद्यकीय अधिकारी (+91) 77588 05330
4. श्री. मुरलीधरदत्तात्रय सांगळे आरोग्य सेवक (+91) 98698 66511
5. श्री. अक्षय बळवंत पाटील आरोग्य सेवक (+91) 96737 56021
6. श्रीमती. रेवती महेश काळे आरोग्य सेविका (+91) 79723 62855
7. श्रीमती. वनिता सुधीर देशपांडे आरोग्य सेविका (+91) 95039 91213
8. श्रीमती. मनीषा विश्वास जोपळे आरोग्य सेविका (+91) 93260 96897
9. श्रीमती. रोहिणी गणपत गारे आशा वर्कर (+91) 83082 54177
10. सौ. वर्षा सुनील पिंपळे आशा वर्कर (+91) 77449 15534

कृषी विभाग